हॉस्पिटलकडून निलंबन आदेश जारी
पणजी : हेल्थवे या खाजगी ऊग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या मोरोक्कन महिलेवर एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याबाबत तक्रार दाखल होताच ओल्ड गोवा पोलिसांनी संशयित डॉक्टरला सांगली येथे अटक केली आहे. गोव्यात आणून त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 64(2)(ई), 74, 75, 76, आणि 79 अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. त्याला रिमांडसाठी न्यायालयात हजर केले असता 1 दिवसाची न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयिताचे नाव डॉ. वृक्षभ दोशी (डीएनबी विद्यार्थी) असे आहे. लैंगिक अत्याचाराची घटना 31 ऑगस्ट रोजी घडली होती. पीडितेच्या बहिणीने 10 सप्टेंबर रोजी ओल्ड गोवा पोलिसस्थानकात तक्रार दाखल केली होती. संशयिताने पीडित महिलेवर लैंगिक अत्याचार केला. अधिकारपदावर असताना तिचा विनयभंग केला आणि बलात्कार केला, असे तक्रारीत म्हटले आहे.
महाराष्ट्रातील सोलापूर येथील रहिवासी असलेल्या या संशयिताला सांगली येथे अटक करण्यात आली आहे. गुह्यानंतर संशयित गोवा सोडून पळाला होता. पोलिसांनी खास पथक तयार केले आणि संशयिताचा सांगली येथे शोध घेण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली, पुढील पोलिस चौकशी होईपर्यंत दोशीला गुऊवारी तातडीने निलंबित करण्यात आले आहे, असे हेल्थवे हॉस्पिटलने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. ऊग्णालयात उपचार घेत असलेल्या पीडितेला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. ऊग्णालय पीडितेला तिच्या कठीण काळात सर्व आधार देत राहील, असे निवेदनात म्हटले आहे.









