ऑनलाईन टीम/तरुण भारत
कोणत्याही ऋतूत अनेकांना त्वचेचे आजार होताना दिसतात. बऱ्याच जणांना फंगल इन्फेक्शन (fungal infection) त्रास होतो. अशावेळी आपण अनेक औषधोपचार करतो. पण फंगल इंफेक्शनपासून सुटका मिळवण्यासाठी प्रत्येक वेळेस औषधोपचारांची गरज नसते, तर घरगुती उपाय देखील लाभदायक ठरतात.
बऱ्याच वेळा आपल्याला कामामुळे आरोग्याच्या स्वच्छतेची काळजी घेता येत नाही. काहींना काही कारणाने याकडे आपण दुर्लक्ष करत असतात. त्यामुळे त्वचेचे अनेक आजार झपाट्याने वाढताना दिसतात, त्यापैकीच एक म्हणजे म्हणजे फंगल इन्फेक्शन. उन्हाळ्यात घामाने किंवा पावसाळ्यात सतत अंग पावसाच्या पाण्याने भिजल्याने अनेकांना फंगल इन्फेक्शन होते. हा आजार संसर्गजन्य आहे. पावसातून कामावर जाताना भिजलेले पाय, ओले कपडे, भिजलेले केस लवकर सुकत नाही, यामुळे फंगल इन्फेक्श जास्त प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. अशावेळी महागडे औषधं घेऊन देखील साधे आजार लवकरात लवकर बरे होत नाही, त्यावेळी घरगुती इलाजच लहानसा आजार लवकर बरे करतात.
फंगल इन्फेक्शनपासून दूर राहण्यास घरगुती उपाय
घट्ट कपडे घालणे टाळा, ओले मोजे घालू नका, दररोज कपडे उन्हात वाळवा, नेहमी सैल आणि सुती कपडे वापरा, वेळच्यावेळी नखं कापा, अॅंटी-बॅक्टेरिअल साबणाचा वापर करा. दुसऱ्यांचे कपडे, कंगवा, टॉवेल वापरू नका. याचा उपचार मध्येच सोडू नका. नाहीतर फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.
स्वछता ठेवा
किमान दिवसातून दोन वेळा स्वच्छ कोमट पाण्यानं आंघोळ करा. कपडे स्वच्छ उन्हात सुकवा आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक कपड्याला इस्त्री करा.पूर्ण सुकलेले कपडे परिधान करा. त्यामुळे कपड्यावरील फंगलचे विषाणू मरण्यास मदत होईल.
खोबरेल तेल
फंगल इन्फेक्शन झालेल्या ठिकाणी शुद्ध खोबरेल तेल लावून मालिश करा. मात्र सगळ्या प्रकारच्या फंगल इन्फेक्शनला हे चालेल असे नाही. काही वेळेला डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.
कडुनिंब
कडुनिंब हे बुरशी मारण्यासाठी उत्तम औषध आहे. कडुनिंबाचा पाला आंघोळीच्या गरम पाण्यात टाकून स्वच्छ आंघोळ करावी. कडुनिंबाच्या पानांची पेस्ट फंगल इन्फेक्शन झालेल्या जागी लावावी. रोज दोन कोवळी पानं खावी. त्यामुळे फरक पडतो.
तुरटी
फंगल इन्फेक्शनमध्ये सर्वात गुणकारी औषध म्हणजे तुरटी. आंघोळीच्या पाण्यात तुरटी फिरवावी किंवा तुरटीचे पाणी इन्फेक्शन झालेल्या जागी लावावे ते पुसून टाकू नये.
लसूण
ऑलिव्ह ऑइलमध्ये लसणाच्या पाकळ्यांचा रस काढून ते तेल लावावं. कारण लसूण अॅन्टीफंगल म्हणून काम करतं
कोरफड
कोरफडीचा गर काढून तो फंगल इन्फेक्शन झालेल्या ठिकाणी लावावा. त्यामुळे खाज सुटणार नाही तसेच त्वचेची आग होणार नाही.