ऑनलाईन टीम/तरुण भारत
देशात कोरोना (corona) रूग्णसंख्येच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांची चिंता वाढली आहे. कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रूग्णसंख्या वाढत असल्याने आढावा बैठक घेत संबंधित राज्यांना काळजी घेण्यास सांगितलं आहे. तर महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनीही पुन्हा एकदा मास्क (Mask) सक्तीचा इशारा दिला आहे.
राजेश टोपे यांनी कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तरी राज्यात सध्या चिंता करण्यासारखी परिस्थिती नाहीये. परंतु रुग्णसंख्या वाढल्यास पुन्हा मास्कसक्ती करावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
पुढे बोलताना टोपे म्हणाले, सर्व वयोगटातील नागरिकांचं लसीकरण (Vaccination) करण्यात येणार असून केंद्राकडून सूचना आल्यानंतर त्यानुसार नियोजन केलं जाईल आणि आरोग्य विभागाला तशा सूचना केल्या जातील. मात्र नागरिकांनी मास्क वापरावा, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याची मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. मास्क वापरण्यासाठी पुन्हा सांगायचं का यावरही चर्चा झाली. सध्या लोकांना आवाहन केलं असून ऐच्छिकच ठेवलं आहे. नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपली जबाबदारी ओळखून काम करण्याचं आवाहन केलं आहे.