प्रतिनिधी / बेळगाव
येथील तनिष्क या टाटाच्या ज्वेलरी शोरूममध्ये महिला दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात आले. तनिष्कमधील कर्मचारी आणि निमंत्रित महिलांना डॉ. दीप्ती बागेवाडी, केएलईमधील सायकोथेरपी विभागाच्या प्रमुख डॉ. गिरीजा सानिकोप एमडी आयुर्वेद यांनी आरोग्याच्या टिप्स दिल्या.
रोजच्या जीवनात दैनंदिन कार्याबरोबरच स्वत:चे आरोग्य कसे चांगले ठेवावे, त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी कराव्यात याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी उपस्थित असलेल्या प्रतिभा सडेकर यांनीही मार्गदर्शन केले. उपस्थितांचे स्वागत तनिष्क शोरूमचे संचालक संतोष चांडक यांनी केले. तनिष्क कंपनीमध्ये सोन्याचे दागिने कशा पद्धतीने तयार केले जातात, त्यांच्यावर कशा प्रक्रिया होतात याचा व्हिडिओ उपस्थितांना दाखविण्यात आला. तो पाहून उपस्थित महिला अचंबित झाल्या. तनिष्कमधे जुने सोने घेऊन नवीन सोने दिले जाते, याबाबतची माहितीही देण्यात आली. पाहुण्यांच्या हस्ते केक कापण्यात आला. शंभरहून अधिक महिला उपस्थित असलेल्या या कार्यक्रमाचा समारोप अमित कुरणे यांनी आभार प्रदर्शन केल्यानंतर मिठाई वाटप करून करण्यात आला.









