प्रतिनिधी/ बेळगाव
जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखीतर्फे चव्हाट गल्ली येथील जिजामाता हायस्कूल येथे ‘पौगंडावस्थेतील मुलींसोबत संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पुणे येथील मानसोपचार सल्लागार उज्ज्वला भोईर उपस्थित होत्या.
उज्ज्वला भोईर म्हणाल्या, किशोरवयीन मुलींनी आरोग्यासह आहाराकडे लक्ष देणे महत्त्वाचे असते. मुलांना योग्य वयात योग्य गोष्टी समजावून सांगितल्या नाहीत तर ते चुकीच्या मार्गाला जाऊ शकतात. व्यासपीठावर मुख्याध्यापक एन. डी. पाटील, सखीच्या माजी अध्यक्षा चंद्रा चोपडे, सचिव सुलक्षणा शिनोळकर उपस्थित होत्या.
अध्यक्षा विद्या सरनोबत यांनी स्वागत केले. उपस्थितांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संजीवनी फाऊंडेशनच्या सविता देगिनाळ यांचे सहकार्य लाभले. यावेळी सखीच्या संस्थापक अध्यक्षा ज्योती अनगोळकर, उपाध्यक्षा अपर्णा पाटील, शीतल पाटील, राजश्री कंग्राळकर, शीला खटावकर यासह शिक्षिका उपस्थित होत्या. अंजली चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर सुलक्षणा शिनोळकर यांनी आभार मानले.