सातारा :
पावसाची कधी उघडीप तर कधी एखादी सर तर कधी उन्हाचा कडाका जाणवत आहे. अशा बेभरवशाच्या वातावरणामुळे सातारा शहरात कोणतीही साथ उद्भवू नये या करता सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाला सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी सूचना दिल्या आहेत. आरोग्य विभाग अॅक्शन मोडवर आला आहे.
सुचनेनुसार आरोग्य विभागाचे निरीक्षक राकेश गालियाल हे अनुभवाच्या जोरावर कार्यतत्पर आहेत. ते चांगल्या प्रकारचे काम हॅण्डल करताना दिसत आहेत. त्यांनी मुळ सातारा शहरासह हद्दवाढ भागात सुविधा देण्यामध्ये कुठेही कमतरता दिसत नाहीत. औषध फवारणी, धूर फवारणी, गटाराची स्वच्छता आदी कामे करण्याच्या सूचना देवून स्वत: वैयक्तिक कामाकडे लक्ष दिले आहे.
पावसाळ्याच्या दिवसात शहरात कुठेही आरोग्याची समस्या उद्भवू नये, कोणतीही साथ येवू नये यासाठी सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या सुचनेनुसार आरोग्य विभागाचे प्रमुख राकेश गालियाल यांनी सर्वच कर्मचाऱ्यांना कार्यवाही करण्याच्या सूचित केले आहे. त्यानुसार मुळ शहराबरोबरच हद्दीत आलेल्या उपनगरात गटार स्वच्छता, धूर फवारणीच्या कामाला वेग घेतला आहे. तसेच कुणाचे कुठे गटर तुंबल्याची तक्रार येताच लगेच त्याबाबतची कार्यवाही केली जात आहे. एकुणच आरोग्य विभाग अॅक्शन मोडवर आहे. आकाशवाणी झोपडपट्टी येथील माजगावकर माळ भागात सामाजिक कार्यकर्ते सचिन कांबळे यांनी पालिकेच्या सहकार्याने औषधे फवारणी करुन घेतली आहे. त्याचबरोबर कामाठीपुरा गोडोली येथे गटरची समस्या उद्भवली. त्याबाबत स्थानिक नागरिक पालिकेत आरोग्य विभागात पोहोचले होते. तेथे आरोग्य निरीक्षक गणेश काकडे होते. त्यांच्याकडे स्थानिकांनी आमची गैरसोय दूर करा, अशी मागणी केली होती. तेव्हा माजी नगरसेवक रणजित साळुंखे यांनी त्या स्थानिकांना समस्या सोडविण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत, असे आश्वासन दिले.
गणेश काकडे यांनीही कार्यवाही करण्याच्या सुचना संबंधितांना दिलेल्या आहेत. समर्थ मंदिर येथेही गटर अडकले होते. त्याबाबत माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी एक फोन फक्त आरोग्य विभागाचे निरीक्षक राकेश गालियल यांना त्यांनी केला तर काही वेळातच आरोग्य विभागाची सक्षण गाडी व कर्मचारी तेथे पोहचले. त्यांच्या माध्यमातून काम सुरु करण्यात आले. काही वेळातच काम पूर्ण करण्यात आले. एकूणच आरोग्य विभाग अलर्ट मोडवर काम करत आहे.
- आरोग्य विभागाचे काम चांगले आहे
सातारा नगरपालिकेच्यावतीने शहरातील विविध ठिकाणी गटार, पाईपलाईनच्या स्वच्छतेचे काम सुरू आहे. पावसाने थोडी उघडीप दिल्याने आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केलेली स्वच्छता मोहीम कौतुकास्पद आहे. याबद्दल सातारा नगरपालिका व आरोग्य विभागाचे शाहुनगरवासियांच्या वतीने जाहीर आभार.
– सुहास राजेशिर्के, माजी उपनगराध्यक्ष.








