प्रतिनिधी / बेळगाव
लोककल्प फौंडेशन व केएलई आयुर्वेदिक कॉलेज, शहापूर यांच्यावतीने खानापूर तालुक्यातील दारोळी येथे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 50 हून अधिक जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे या आयुर्वेदिक शिबिरामध्ये उपस्थितांना आयुर्वेदाचे महत्त्व आणि त्याचा प्रभाव याबद्दल माहिती देण्यात आली. केएलई हॉस्पिटलचे डॉ. बलाराम, डॉ. मौनिश, डॉ. सिमरन, डॉ. सहना के., पीआरओ श्रीधर यांनी रुग्णांची तपासणी केली. लोककल्पचे सूरजसिंग रजपूत, संतोष कदम, अनंत गावडे, परशुराम गावडे आदी यावेळी उपस्थित होते.









