दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी उपक्रम
बेळगाव : लोककल्प फौंडेशन आणि अरिहंत हॉस्पिटल यांच्या सहकार्याने हंदिकोप्पवाडा (ता. खानापूर) येथे मोफत सामान्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. या शिबिरामध्ये 40 हून अधिक गावकऱ्यांनी सहभाग घेतला. उच्च रक्तदाब, मधुमेह तसेच इतर तपासण्या करून त्यांना वैद्यकीय सल्ला देण्यात आला. अरिहंत हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकातील डॉ. गीता साळुंखे, लक्ष्मी पाटील, शिवराज कातापूर यांनी सेवाभावाने काम केले. लोककल्प फौंडेशनतर्फे संदीप पाटील, अनंत गावडे यांनी शिबिराचे आयोजन व समन्वयकाची भूमिका बजावली. लोककल्प फौंडेशन हे लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या सीएसएआर उपक्रमातून चालविले जात आहे. या उपक्रमातून खानापूर तालुक्यातील 32 गावे दत्तक घेऊन त्यांना आरोग्य, शिक्षण, उपजीविका व पायाभूत सुविधा पुरविल्या जात आहेत.









