प्रतिनिधी/ बेळगाव
इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए), गिजरे मॅटर्निटी हॉस्पिटल व सुभाषचंद्रनगर महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदाब, मधुमेह, थायरॉईड यासह इतर आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. 70 हून अधिक महिलांनी यामध्ये सहभाग घेतला होता.
डॉ. मंजुषा गिजरे, डॉ. राजश्री अनगोळ यांनी महिलांची आरोग्य तपासणी करून त्यांना आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. मंडळाच्या सदस्या राधिका तेंडुलकर, रेणुका कुट्रे, स्मिता चिरमुले, चैत्रा चिटणीस, भारती कंग्राळकर यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी मदत केली.









