लोककल्प-केएलई आयुर्वेदतर्फे आयोजन
बेळगाव : लोककल्प फाऊंडेशन व केएलई आयुर्वेदिक हॉस्पिटल यांच्यावतीने 31 ऑक्टोबर रोजी ओतोळी येथे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. लोककल्प फाऊंडेशनअंतर्गत लोकमान्य सोसायटीने ओतोळी गाव दत्तक घेतले आहे. यावेळी डॉक्टरांनी हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित तसेच चयापचय आरोग्याबद्दल माहिती दिली. त्यांनी रक्तदाब व ब्लडशुगरची चाचणी केली. केएलई आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या डॉक्टरांतर्फे डॉ. हेमलता, डॉ. पल्लवी जैन, डॉ. गायत्री, डॉ. संवेद मोहिते, डॉ. नारायण हलाली, डॉ. विद्या कोनार, श्ा़dरीधर के. उपस्थित होते. लोककल्प फाऊंडेशनतर्फे सूरजसिंग राजपूत, संतोष कदम, अनंत गावडे, सुहास पेडणेकर उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकुर यांना धन्यवाद दिले.









