प्रतिनिधी/ बेळगाव
लोककल्प फौंडेशन व वेणुग्राम हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर तालुक्यातील आमगाव येथे आरोग्य शिबिर घेण्यात आले. 80 हून अधिक ग्रामस्थांनी शिबिराचा लाभ घेतला. यामध्ये बीपी व अन्य आरोग्य तपासणी करण्यात आली.
वेणुग्रामचे डॉ. यासिम यांनी रुग्णांची तपासणी केली. त्यांना नर्सिंग विभागाच्या दीपा तसेच पीआरओ जगदीश बेळगावकर यांचे सहकार्य लाभले. यावेळी लोककल्पचे किशोर नाईक, संदीप पाटील उपस्थित होते. या शिबिरामुळे गावापर्यंत आरोग्य सेवा नेण्यात आल्याने ग्रामस्थांची गैरसोय दूर झाली आहे.









