रत्नागिरी : प्रतिनिधी
शहरातील मारूती मंदिर परिसरात असलेले प्रियंका वाईन मार्ट दुकान चोरट्यांनी फोडून 70 हजार रूपयांची रोकड चोरून नेल़ी ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडल़ी या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली आह़े दरम्यान शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले दुकान चोरट्यांनी फोडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आह़े.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी प्रियंका वाईन मार्ट हे दारूविक्रीचे दुकान नेहमीप्रमाणे बंद करण्यात आले होत़े बुधवारी सकाळी कर्मचारी हे दुकान उघडण्यासाठी आले असता शटरचे कुलूप तोडलेले आढळून आल़े या घटनेची खबर रत्नागिरी शहर पोलिसांना देण्यात आल़ी यावेळी दुकानातील आतील मालाची तपासणी व पंचनामा करण्यात आल़ा दुकानात सायंकाळी ठेवलेली 70 हजार रूपयांची रोकड चोरीला गेल्याचे दुकानाचे मालक यांच्या लक्षात आल़े.
या प्रकरणी पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी श्वानपथक पाचारण करण्यात आल़े मात्र चोरट्यांचा कोणताही सुगावा लागला नाही.या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध भादंवि कलम 380,457 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक पाटील करत आहेत़.









