अध्याय पंधरावा
सिद्धी कशा साध्य होतात हे सांगताना भगवंत उद्धवाला म्हणाले, अष्टमहासिद्धी माझ्यामध्येच असतात, तरी त्या साध्य करायला दुर्घट आहेत. जो साधक मन सूक्ष्म मन करून जर माझ्यामध्ये स्थिर ठेवून अणुरेणुमात्र अशा माझ्या स्वरूपाचेच नेहमी ध्यान करेल, त्याचा देहही अणुप्रमाणेच होतो आणि त्याला ‘अणिमा’ सिद्धी प्राप्त होते. आपल्या मनात जो महतत्ववरूप धारण करतो, त्याला महत्तत्त्वाकार ‘महिमा’ नावाची सिद्धी प्राप्त होते. त्याचप्रमाणे एकेका महाभूताची त्याने मनात धारणा केली, तर त्याला त्या त्या महाभूताएवढी ‘महिमा’ नावाची सिद्धी प्राप्त होते. मी अणुरेणूंच्याही अणुरेणूइतका सूक्ष्म आहे. मी प्रत्येक जीवाच्या हृदयात राहतो. जो कोणी त्याप्रमाणे मन अणुमात्र सूक्ष्म करून, माझ्यामध्ये स्थिर ठेवेल आणि माझ्या अणुरेणुमात्र स्वरूपाचे ध्यान करेल, त्याचा देहही अणुप्रमाणेच होईल आणि त्याला ‘अणिमा’ सिद्धी प्राप्त होईल. माझे स्वरूप अनंत आणि अपार आहे, महत्तत्त्वाहूनही अत्यंत मोठे आहे तसेच महत्तत्त्वाचा नियंताही मीच आहे. हा माझा महिमा जाणल्याने त्याला महिमा सिद्धी प्राप्त होते. महिमा सिद्धी साध्य करण्याकरिता, जो माझे ध्यान अपरंपार, विशाल आहे हे लक्षात घेऊन त्याची धारणा करेल, त्याचे शरीरही तेवढेच मोठे होईल. म्हणून ह्या सिद्धीचे माहात्म्यही मोठे आहे. कापसाचे तंतू सूक्ष्म असतात तरी त्यांचे आपल्याला पाहिजे तेवढे मोठे वस्त्र तयार होते. त्याप्रमाणे माझे ध्यानही जो मोठय़ा स्वसरूपात कल्पून धारणा धरतो, त्याला माझी महिमा सिद्धी प्राप्त होते. त्याच्याइतके वजन होणारी दुसरी वस्तु पाहू लागले असता सर्व पर्वतांसह पृथ्वीही त्या वजनाची बरोबरी करू शकणार नाही पण सिद्धीच्या योगाने साधक एवढय़ा महत्तत्त्वाला चढतो. जो योगी आपले चित्त परमाणुस्वरूप अशा माझ्या ठिकाणी लावतो, त्याला ‘लघिमा’ नावाची सिद्धी प्राप्त होते व त्याला कालाच्या सूक्ष्म परमाणूएवढे रूप घेता येते. वायु आदिकरून प्राणासारखी सूक्ष्म तत्त्वे आहेत. त्यांच्या योगाने कालसूत्राचे माप परमाणुस्वरूप भगवंत करू शकतो. त्या परमाणुस्वरूप भगवंतांचे जो सदासर्वदा एकनि÷sने ध्यान करेल त्याच्या देहाला अत्यंत हलकेपणा प्राप्त होतो. इतका की, तो अगदी माशिवर बसून गगनात विहार करू शकतो. अणिमादिक ज्या तिन्ही धारणा आहेत, त्या ह्या देहाच्याच सिद्धी होत, हे लक्षात ठेवावे. त्या देहामध्ये सूक्ष्मपणा, जडपणा व हलकेपणा इत्यादि लक्षणे उत्पन्न करतात.
त्यांच्या धारणेचा तो विधीही सांगतो ऐक. योग्याने जर सात्त्वीक अहंकाररूप माझ्यामध्ये आपले मन एकाग्र केले, तर तो सर्व इंद्रियांवर स्वामित्व मिळवू शकतो. अशा प्रकारे मन माझ्या ठिकाणी लावणारा भक्त ‘प्राप्ती’ नावाची सिद्धी प्राप्त करून घेतो. मूळच्या शुद्ध अहंकारामुळे इंद्रियांचे विकार उत्पन्न होतात. ह्या विकारांपासून सुटका करून घेण्यासाठी जो इंद्रियांचा आश्रयभूत, त्यास चेतना देणारा, असा देवाधिदेव ईश्वराच्या म्हणजे माझ्या ठिकाणी ध्यान धरले असता, इंद्रियअधि÷ानाच्या ज्या देवतांशी एकात्मता होऊन त्याच्या अंगी इंद्रियप्रकाशक धर्म येतो. ह्यामुळे जगातील इंद्रियांचे जे व्यापार चाललेले ते सर्व तो स्वतःच तेथे प्रगट होऊन खरोखर पहात असतो. एवढय़ा इंद्रियप्राप्तीच्या सिद्धीचे वैभव तो साध्य करून घेतो. त्यामुळे ज्याच्या ज्याच्या इंद्रियांचा व्यापार जेथे जेथे होतो, तो तो ह्यानेच केला आहे अशी प्रतीती होते. ती ‘इंद्रियप्राप्ती’ नावाची सिद्धी होय. महत्तत्त्वाचा अभिमानी असा जो सूत्रात्मा त्या रूपातील माझ्या ठिकाणी मनाची धारणा केली, तर ‘प्राकाम्य’ नावाची सिद्धी प्राप्त होते. तो अव्यक्तापासून जन्मलेल्या मज परमे÷ाrचे श्रे÷त्व प्राप्त करून घेतो. जे महत्तत्त्व आहे, तेच मायेचे पहिले स्फुरण होय असे समज. ह्यालाच ‘सूत्रप्रधान क्रिया’ असे नाव दिलेले आहे. त्यात मी स्वतः जन्मरहित असूनही त्या सूत्राचा सूत्रात्मा झालो आहे. त्या माझ्या स्वरूपाचे जो सावध चित्ताने ध्यान करतो
त्याला, ब्रह्मांड व हिरण्यगर्म प्रकाशमान करणारी प्रकाशकताच वश होते.
क्रमशः







