मुंबई
खासगी क्षेत्रातील बँक एचडीएफसी बँकेचा समभाग सोमवारी शेअरबाजारात 2.1 टक्के घसरणीत राहिला होता. अशाप्रकारे घसरणीसह कंपनीचा समभाग सोमवारच्या सत्रात एकावेळी 1656 रुपयांपर्यंत खाली आला होता. गुरुवारी बँकेचा समभाग 1695 या भावावर बंद झाला होता. मार्चअखेरच्या तिमाहीत बँकेने 20 टक्के वाढीसह 12047 कोटी रुपयांचा नफा पदरात पाडून घेतला आहे.









