नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी खासगी बँक एचडीएफसी बँकेने आपल्या व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने एमसीएलआर दर 35 बेसीस पॉइंटस्ने वाढवला असून सदरचा नवा दर हा 7 जूनपासून लागू करण्यात आला आहे. एचडीएफसी बँकेने आतापर्यंत 60 बेसीस पॉइंटस्ची वाढ मागच्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर दरात केली असल्याची माहिती आहे. पतधोरण समिती बैठकीनंतर बँकेने त्यावेळी 25 बेसीस पॉइंटस्ची वाढ केली होती. त्यामुळे व्याजदर आता 7.50 टक्के इतका असणार असल्याचे समजते.









