मुंबई
खासगी क्षेत्रातील कर्जादात्यांमध्ये सर्वात मोठा कर्जदाता म्हणून ओळख असणाऱया बँकेपैकी एक असणारी एचडीएफसी बँकेने आता आपल्या ग्रामीण बँकिंगकरीता वेगळे कार्यक्षेत्र निर्माण केले आहे. यासोबतच बँक आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये दुर्गमभाग व निमशहरी भागात बँक जवळपास 1,060 शाखा उघडणार आहे.
विशेष म्हणजे, व्यावसायिक बँका सध्या ग्रामीण बँकिंग व्यवसायावर अधिक लक्ष केंद्रीत करत आहेत आणि विशेषतः खासगी बँका असे करत आहेत. या संधीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ कार्यकारी उपाध्यक्ष अनिल भावनानी यांनी म्हटले आहे, की आव्हान आणि संधी दोन्ही असून आगामी काळात ग्रामीण व निमशहरी भागात आणखीन शाखा उघडल्या जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
ग्रामीण बँकिंगसाठी भवनानी यांचे नेतृत्व
बँकेने ग्रामीण बँकिंग कार्यक्षेत्रातील नेतृत्व करण्यासाठी अनिल भवनानी यांची नियुक्त केली आहे, जे मागील 19 वर्षांपासून एचडीएफसी बँकेत काम करत आहेत.