मुंबई :
एचडीएफसी बँक लिमिटेडने मंगळवारच्या सत्रात शेअरबाजारात आपला 20 हजार कोटी रुपयांच्या बाजार भांडवलाचा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केला आहे. मंगळवारी शेअरबाजारात इंट्रा डे दरम्यान बँकेचे समभाग 2 टक्के इतके वधारत व्यवहार करत होते. आगामी काळात समभाग 38 टक्के इतका वाढू शकतो, असे काही जाणकारांचे म्हणणे आहे. बीएसईवर मंगळवारी समभाग 1.86 टक्के वाढत 1558 रुपयांवर व्यवहार करत होता.









