नवी दिल्ली :
भारतामधील सर्वात मोठी खासगी बँक एचडीएफसी बँक लिमिटेडला तिमाहीमध्ये वर्षाच्या सरासरी 2.2 टक्क्यांनी नफा कमाईत नफा 16,736 कोटी रुपयावर पोहोचला आहे. जो मागील वर्षातील समान तिमाहीच्या दरम्या 16,372.5 कोटी रुपये झाला होता. बँकेचा निव्वळ व्याजातून झालेला नफा हा 8 टक्क्यांनी वधारुन तो 30,690 कोटी झाला आहे. तिमाहीत ग्रॉस एनपीए 1.42 टक्क्यांवर राहिला, जो मागील तिमाहीत 1.36 टक्क्यांवर होता. तसेच नेट एनपीए 0.46 टक्क्यांवर राहिला आहे. दरम्यान चालू तिमाहीत एचडीएफसी बँकेची असेट क्वालिटी खराब राहिली आहे.









