मुंबई :
एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेसचा आयपीओ 13 टक्क्यांच्या प्रीमियमवर, बीएसईवर प्रति समभाग 835 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला आहे. एचडीएफसी बँकेची उपकंपनी एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेसचे शेअर्स बीएसई आणि एनएसई दोन्ही एक्सचेंजेसवर सूचीबद्ध झाले आहेत. त्याची इश्यू किंमत प्रति शेअर 740 रुपये आहे.
कंपनीचा आयपीओ 25 जून रोजी उघडला आणि 27 जून रोजी बंद झाला. इश्यूला एकूण 27 पट सबक्रिप्शन मिळाले, ज्यामध्ये क्यूआयबी म्हणजेच पात्र संस्थात्मक खरेदीदार श्रेणीने 55.47 पट, एनआयआय (नॉन-इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स) ने 9.99 पट आणि किरकोळ गुंतवणूकदारांनी 5.72 पट सबक्रिप्शन केले.









