दुसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर :12 रुपयांचा लाभांश देणार
नवी दिल्ली:
एचसीएल टेक्नॉलॉजीने आर्थिक वर्ष 2026 च्या दुसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला असून 4236 कोटी रूपयांचा नफा कंपनीने प्राप्त केला आहे. या आधीच्या जून अखेरच्या तिमाहीत कंपनीने 3843 कोटी रूपयांचा नफा प्राप्त केला होता. त्या तुलनेमध्ये नफा यंदा 10 टक्के वाढला आहे. याच दरम्यान कंपनीने लाभांशाची घोषणा देखील केली आहे.
तज्ञांनी कंपनीला 4278 कोटी रूपयांचा नफा होईल असे म्हटले होते. तुलनेत नफा काहीसा कमी नोंदला गेला. कंपनीचे तिमाही आधारावर उत्पन्न 30349 कोटी रूपयांवरुन वाढून 31942 कोटी रूपयांवर पोहचले. उत्पन्नामध्ये 5 टक्क्यांची वाढ पहायला मिळाली. कंपनीने 12 रूपये प्रति समभाग लाभांशाची घोषणा केलेली आहे. अंतरीम लाभांशाची रेकॉर्ड तारीख 17 ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे.









