बेंगळूर
एचसीएल टेक्नॉलॉजी या आयटी क्षेत्रातील कंपनीने अलीकडेच 350 जणांना कामावरुन कमी केले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. जागतिक महागाईच्या कारणास्तव कंपनीने असे पाऊल उचलले असे बोलले जात आहे. भारतीय आयटी कंपनी जागतिक स्तरावर वाढलेल्या दबावामुळे अडचणीत आली आहे. यामध्ये कमी करण्यात आलेले कर्मचारी हे भारत, फिलीपीन्स, ग्वाटेमाला व इतर देशातील असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.









