वृत्तसंस्था/ न्यू ओर्लेन्स
येथे सुरु असलेल्या अमेरिकन क्लासिक जिमनॅस्टीक स्पर्धेत अमेरिकेची महिला जिमनॅस्ट हेझली रिव्हेराने दर्जेदार कामगिरी करत बॅलेन्स बीम प्रकारात आघाडीचे स्थान मिळविले आहे.
रिव्हेराने या क्रीडा प्रकारात 55.600 गुण नोंदवित या क्रीडा प्रकारातील पहिले राष्ट्रीय जेतेपद मिळविण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत महिलांच्या सांघिक बॅलेन्स बीम प्रकारात अमेरिकेला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या महिला जिमनॅस्टमध्ये रिव्हेराचा समावेश होता. 17 वर्षीय रिव्हेराने बॅलेन्स बीम प्रकारात 14.350 गुण घेत आघाडीचे स्थान मिळविले. तसेच तिने फ्लोअर एक्सरसाईज प्रकारात 14.000 गुण नोंदवित भक्कम आघाडी घेतली. 2028 मध्ये होणाऱ्या लॉज एंजिल्स ऑलिम्पिक स्पर्धेत रिव्हेरा ही अमेरिकेची आघाडीची महिला जिमनॅस्ट राहिल. न्यू ओरलेन्समधील या स्पर्धेत जोसेलिन 55.400 गुणासह दुसऱ्या स्थानावर असून लिने वाँग 55.100 गुणासह तिसऱ्या स्थानावर आहे.









