कोल्हापूर
येथील शिवाजी तंत्रनिकेत (जुने सायन्स कॉलेज )च्या आवारात आज सकाळी एका उंच फणसाच्या झाडाच्या फांदीत, पतंगाचा मांज्या पायामध्ये आडकून बराच काळ लोंबकळत असलेली एक घार दिसून आली.

परिस्थिती तेथील कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी अडकलेल्या घारीला वाचाविण्यासाठी आग्निशामक विभागाला संपर्क साधला. तात्काळ अग्निशामक जवानांनी त्या घारीला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

जखमी घारीला अलगदरित्या फांदीवरून उतरविण्यात आले. थकलेल्या पक्ष्याला पाणी पाजून जिवदान दिले.








