तुम्ही पेंग्विनविषयी निश्चितच ऐकले असेल. तसेच त्याची छायाचित्रेही पाहिली असतील. काळ्या-पांढऱ्या रंगाच्या या गोंडस प्राण्याचा आकार लहान मुलांइतका असतो. परंतु तुम्ही कधी लिटिल पेंग्विन किंवा फेयरी पेंग्विनविषयी ऐकले आहे का? हा छोटा पक्षी अत्यंत सुंदर अन् काही चकित करणाऱ्या सवयी बाळगून असतो. त्याच्या अनेक सवयी त्याच्या आकार-प्रकारापेक्षा अत्यंत वेगळ्या आहेत.
लिटिल पेंग्विन हे पेंग्विनची सर्वात छोटी प्रजाती असतात. सरासरी त्यांची उंची केवळ 30-40 सेंटीमीटर असते आणि त्यांचे वजन एक किलो इतकेच असते. रात्रभर झोपूनही ते पाण्यात संचार करताना झोपी जात असतात. एकावेळी केवळ 4 मिनिटांपर्यंतच झोपत असतात.
दिसण्यास अत्यंत गोंडस असणारे लिटिल पेंग्विन हे मांसाहारी असतात, ते मासे, सक्विड आणि क्रिल यासारख्या जीवांची शिकार करतात आणि अधिक वेळ भोजनाशिवाय राहू शकत नाहीत. याचमुळे ते स्वत:चा बहुतांश वेळ समुद्रात घालवतात. समुद्रात जाण्याचा उद्देशच भोजन प्राप्त करणे असतो. पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांची शिकार केल्यामुळे लिटिल पेंग्विन हे शिकारीत तरबेज असतात. लिटिल पेंग्विन अत्यंत खोलवर जात असतात. याचबरोबर माशांची शिकार करत त्यांना जमा करण्यासाठी ते खोलवर जातात. लिटिल पेंग्विन 80 मीटर खोलवर समुद्रात पोहोचत असतात.
दिवसभर शिकार केल्यावर ते सूर्यास्त झाल्यावरच समुद्रकिनारी पोहोचतात आणि आयुष्यभर स्वत: तयार केलेल्या बिळासारख्या घरात राहतात. हा पक्षी प्रामुख्याने न्युझीलंडच्या फिलिप बेटावर आढळून येतो. स्वत:च्या सहकाऱ्यांशी बोलण्यासाठी लिटिल पेंग्विन 9 प्रकारचे आवाज काढत असतो. या वेगवेगळ्या आवाजांचा वापर तो स्वत:चे मित्र आणि परिवारवाल्यांशी संभाषण करण्यासाठी करतो. याचबरोबर हा अन्य पेंग्विनप्रमाणे विस्थापन करत नाही. तर एकाच ठिकाणी राहतो.
लिटिल पेंग्विनचे सरासरी वय 7 वर्षे असते आणि 3-4 वयापासूनच हे प्रजनन करू लागतात. त्यांना पाहण्याची सर्वात चांगली वेळ सूर्यास्तानंतरची असते. तेव्हा ते शेकडोंच्या संख्येत किनाऱ्यावर पोहोचत असतात.









