मालवण / प्रतिनिधी-
आपण जीवन जगत असताना आपली रक्षा करणाऱ्या सीमेवरील सैनिकांना, जगाचे अन्नदाते अर्थातच शेतकरी बांधव आणि आपल्या जीवनाला विधायक दिशा देणारे आपले गुरु, शिक्षक यांचे ऋण कधीही मिळू शकत नाही, मात्र त्यांच्या प्रती आपण नेहमीच उतरायी होण्याचे प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी व्यक्त केले.
मालवण येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या वतीने ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त’ आयोजित व्याख्यानात प्रा. पाटील बोलत होते.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील, प्रा. गणेश उज्वले, प्रा.सचिन राजाध्यक्ष, प्रा. डॉ. योगेश महाडिक, प्रा. दत्तप्रसाद गोलतकर यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित होते.









