ढाका :
शेख हसीना यांचा पक्ष बांगलादेश अवामी लीगवर बंदी घालण्याची अंतरिम सरकारची कुठलीच योजना नसल्याचे अंतरिम पंतप्रधान मोहम्मद युनूस यांनी म्हटले आहे. हत्या आणि मानवतेच्या विरोधातील गुन्ह्यांमध्ये सामील लोकांना देशाच्या न्यायालयांमध्ये खटल्यांना सामोरे जावे लागेल. हसीना यांना देखील खटल्यांना तोंड द्यावे लागणार आहे. देशात निवडणुकीच्या कालावधीत कुठलाही बदल होणार नसल्याचे युनूस यांनी म्हटले आहे. युनूस सरकारने डिसेंबर 2025 किंवा जानेवारी 2026 मध्ये निवडणूक घेण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे.









