कोल्हापूरः
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत कागल मतदार संघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ यांनी पुन्हा विजय मिळवलेला आहे. आमदार मुश्रीफ यांची समरजीतसिंह घाटगे यांच्या सोबत चुरशीची लढत होती.
यावेळी आमदार मुश्रीफ म्हणाले, माझ्या विरोधी प्रचार करायला आलेल्या सर्वांचा मी आभारी आहे. त्यांना कळत नाही अंडर करंट किती होता. आम्ही सभेल गेलो असताना ७० टक्के महिला उपस्थित असायच्या त्यामुळे त्याचा फार मोठा परिणाम झालेला आहे. सत्ता स्थापनेत आता काहीही अडचण नाही. मेजॉरिटी पाहता अपक्ष हे समर्थन देतील. मला ईडीमध्ये अडकवून, माझ्या कुटुबिंयाना त्रास देऊन एक व्यक्ती आमदार होऊ इच्छित होती, याचा राग कागल मतदार संघात होता, त्याचा परिणाम दिसून आलेला आहे.
Previous Articleकोल्हापूर जिल्हा मतमोजणी निकालाचा आढावा
Next Article कोल्हापूरात ‘महाडिक पॅटर्न’ हिट








