गेल्या काही महिन्यापासून ईडीच्या रडारवर असलेले राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आमदार हसन मुश्रीफ हे अजितदादा पवार यांच्याबरोबर राजभवनावर पोहोचले असून ते आज आपल्या मंत्रीपदाची शपत घेण्याची दाट शक्यता आहे.
आज सकाळपासून देवगिरी निवास्थानासह राजभवनावर मोठ्या घडामोडी घडून येत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अजित पवार हे काही दिवसापासून नाराज असलेल्या बातम्या येत असताना आज सकाळी त्याचा स्फोट झाला. अजित पवार हे आपल्या काही आमदारांसह शिंदे- फडणीवस सरकारला पाठींबा देण्यासाठी राजभवनावर पोहोचले आहेत.
अजित पवार यांच्याबरोबर गेलेले हसन मुश्रीफ मंत्रीपदीची शपथ घेणार आहेत. राजभवनात ते अजित पवार यांच्याबरोबर हजर असून त्यांच्याबरोबर आमदार धनंजय मुंडे, आम. छगन भुजबळ, दिलीप वळसे- पाटील ई महत्वाचे नेते उपस्थित आहेत. हसन मुश्रिफ यांच्यामागे गेल्या काही दिवसापासून ईडीचा ससेमिरा मागे होता. त्यातच राष्ट्रवादीमधील नाराजी नाट्याचा आज विस्फोट झाल्याने ते आज अजित पवारांच्या बाजूने दिसले आहेत.