कोल्हापूर : ईडीच्या छाप्यानंतर नॉट रिचेबल असलेले राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ तब्बल 52 तासानंतर कागलमध्ये परतले आहेत. कागलमध्ये परतल्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबियांची भेट घेतली. मी बाहेरगावी होतो, त्यावेळी ईडीचे अधिकारी कागलमध्ये येऊन गेले. त्यामुळे माझ्या कुटुंबियांची काय अवस्था झाली ती मी टिव्हीवर पाहिली. म्हणून मी आज कुटुंबियांना भेटायला आलो.
दरम्यान, ईडीने मला कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. मात्र, आज मी ईडीच्या कोणत्याही चौकशीला सामोरे जाणार नाही. ईडी कार्यालयातून माझ्या वकिलामार्फत मी मुदत घेणार आहे.
VIDEO : ईडीच्या छाप्यानंतर तब्बल 52 तासानंतर हसन मुश्रीफ कागलमध्ये दाखल
अधिक वाचा; राजकारणात हुकूमशाही नसावी : उदय सामंत








