प्रतिनिधी,कोल्हापूर
स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांनी शाहू दूध संघ उभारायचा आणि समरजीत घाटगे यांना चेअरमन करायचे ठरविले. त्यावेळी पहिल्यांदा एक हजार रुपयांचा शेअर्स आणि त्याप्रमाणे पावत्या दिल्या. त्या पावत्या पुन्हा बदलून त्यांनी पाच हजारांचा शेअर्स केला. पहिल्यांदा केलेला तो शेअर्स का परत घेतला आणि त्याच्या पावत्या का बदलल्या, याचे कारण घाटगे यांना माहित आहे. याच कारणामुळे आम्हालाही शाहू दूध संघाप्रमाणेच साखर कारखान्यासाठी पैसे उभे करावे लागले. त्यामुळे घाटगे विचारत असलेल्या सभासद कुठे आहेत? जनरल बॉडी कुठे आहे? वार्षिक अहवाल कुठे आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे यामध्ये असल्याचे प्रत्युत्तर आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकाद्वारे दिले.
पत्रकात म्हटले आहे, शाहू दूध संघाचा पाच हजार रुपयांचा शेअर्स घेतलेल्या सभासदांना आज अखेर श्रीखंडाचा अर्धा कपही दिलेला नाही. त्या सभासदांची फसवणूक तर त्यांनी केलेलीच आहे. आता हा शाहू दूध संघ त्यांनी चालवायला दिला की विकलेला आहे, हे दूध संघाच्या व्हन्नूरच्या माळावरील कार्यस्थळावर आणि जिल्ह्यातील चिलींग सेंटवर शाहू दूध संघाच्या बोर्ड ऐवजी केणाचे बोर्ड लागलेले आहेत याची खात्री करावी. यावरूनच ते शाहू दूधसंघाच्या सभासदांची फसवणूकच करीत आहेत. तसेच आरकेव्हीवाय या राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे त्यांनी अनुदान घेतले आहे, यावरही ते स्पष्टपणे बोलायला तयार नाहीत. यावरुन ते अपहार करत असल्याचे सिद्ध होत असल्याचा आरोप आमदार मुश्रीफ यांनी केला आहे. तसेच याबाबत योग्य त्या न्यायालयात सभासदच दाद मागतील, असेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
चाळीस हजार शेतकऱ्यांचे पैसे कुठे गेले, कसे फिरवले याची संपूर्ण माहिती आर.ओ.सी आणि आयकर विभागाला यापूर्वीच दिलेली आहे. ज्या यंत्रणा तपास करीत आहेत किंवा करतील त्यांनाही देऊ. याला आम्ही उच्च न्यायालयातून स्थगितीही आणलेली आहे. परंतु; कोणत्याही परिस्थितीत समोरून लढण्याची हिंमत नाही म्हणून अशा कूटनीतीने मला कुठेतरी अडचणीत आणण्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप मुश्रीफ यांनी पत्रकातून केला आहे.
पुढीलकाळात अशाच प्रकारचा संघर्ष
स्वर्गीय विक्रमसिंहराजे घाटगे यांनी एका विधानसभेला मला सहकार्य केले होते. यानंतर कसबा सांगावचे माजी सरपंच डॉ. तेजपाल शहा यांच्या साक्षीने समरजित घाटगेनाही आम्ही मदत केली होती. परंतु आता त्यांनी काहीच राखायचं नाही असंच ठरवले असेल, तर या पुढील काळात अशाच प्रकारचा संघर्ष होण्याची चिन्हे दिसत असल्याचा इशारा मुश्रीफ यांनी दिला आहे.
समरजीत घाटगे खलनायक
समरजीत घाटगे खलनायक
मुरगूड पोलीस ठाण्यात तक्रार केलेले लोक हे घाटगे यांच्याच कारखान्याचे कामगार आणि संचालक आहेत. समाजकारण आणि राजकारणामध्ये जनतेची सेवा करून, विकासकामे करून, विधायक गोष्टी निर्माण करून मोठ होता येत. जनतेची, शेतकऱ्यांना चुकीची माहिती देवून दिशाभूल करत आहेत. सध्या ते खलनायकाची भुमिका बजावत असल्याचा आरोप आमदार मुश्रीफ यांनी केला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









