Hasan Mushrif ED Raid : आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागल मधील घरात ईडीचं छापा सत्र सुरूच आहे. गेल्या नऊ तासापासून ईडीचे अधिकारी आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरात कारवाई करत आहेत. कुटुंबातील काही सदस्यांचे जबाब घेण्याचं काम सुरु असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र ईडी करावाई सुरु झाल्यापासून आमदार मुश्रीफ मात्र संपर्का बाहेर आहेत. त्यांच्याशी कोणताही संपर्क होत नसल्याने चर्चांना उधाण आले आहे.
हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने तिसऱ्यांदा छापा टाकला आहे. गेल्य़ा दोन्ही छाप्या दरम्यान हसन मुश्रीफ बाहेर होते. या छाप्याच्या दरम्यान ही मुश्रीफ संपर्का बाहेर आहेत. त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र त्यांच्यांशी संपर्क होत नसल्याने उलट-सुलट चर्चांना उधान आले आहे.
Previous Articleजिल्हा बार असोसिएशनच्या निवडणुकीत चुरशीने मतदान
Next Article शिवजयंती निमित्ताने किल्ले रामगडावर फडकला भगवा !









