Hasan Mushrif ED Raid : चार दिवसापूर्वी भाजपच्या नेत्यांनी दिल्लीत जाऊन माझ्यावर कारवाई करावी यासाठी प्रयत्न केले होते. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना आधीच सूचना दिली होती की येत्या चार दिवसात मुश्रीफांवर ईडीची कारवाई होणार आहे.अशा पध्दतीने नाउमेद करण्याचं गलिच्छ काम सुरु आहे. राजकारणामध्ये अशा कारवाया होणार असतील तर याचा निषेधच झाला पाहिजे. सुरुवातीला नवाब मलिक, त्यानंतर हसन मुश्रीफ आणि आता अस्लम शेख यांना टारगेट करत विशिष्ट जाती-धर्माच्या लोकांना टारगेट करत असल्याची शंका निर्माण होतेय अशी प्रतिक्रिया आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. ईडी कारवाई नंतर त्यांनी व्हिडिओ शेअर केलाआहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, याआधी दीड-दोन वर्षांपूर्वी असेच छापे माझ्या घरावर व कारखान्यांवर पडले होते. त्यावेळी सगळी माहिती केंद्रीय यंत्रणांनी घेतली होती.पुन्हा हा छापा का घातलाय माहीत नाही. ३० ते ३५ वर्षांचं माझं सार्वजनिक जीवन सर्वांसमोर आहे.पहिल्या छाप्यांतूनही काही निष्पन्न झालं नव्हतं. त्यामुळं आता कुठल्या हेतूनं छापा घातला कळायला मार्ग नाही.संपूर्ण माहिती घेतल्यानंतर मी मीडियाशी बोलेनच.मात्र, तोपर्यंत कार्यकर्त्यांनी शांतता राखावी, असं आवाहन त्यांनी केलंय.
Previous Articleकुपवाडात हिमस्खलन; जेसीओसह 3 जवानांना वीरमरण
Next Article ‘समृद्धी’वर महिनाभरात 20 कोटींची टोलवसुली









