Hasan Mushrif News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आता 11 एप्रिलला सुनावणी होणार आहे. निकाल येईपर्यंत मुश्रीफांना अटकेपासून दिलेलं संरक्षण कायम असणार आहे. त्यामुळे मुश्रीफ यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना तसेच कोल्हापूर जिल्हा सहकारी बँक यामध्ये कथित गैरव्यवहार केल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांच्यावर आहेत.न्यायमूर्ती एम. जी .देशपांडे यांचं कोर्ट या प्रकरणावर निर्णय देणार आहे.
हसन मुश्रीफ यांची गेल्या तीन आठवड्यांमध्ये तब्बल तीन ते चार वेळा चौकशी झाल्याची माहिती समोर आली आहे. मुश्रीफांनी स्वत: गेल्या आठवड्यात सात तासांच्या चौकशीनंतर आपण ईडी कार्यालयात चौथ्यांदा आल्याची माहिती दिली होती. ईडी अधिकाऱ्यांचा एकही प्रश्न आपण टाळला नसल्याची प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








