ऑनलाईन टीम/तरुण भारत
कोल्हापुरात हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसावरून रामायण सुरु झालं आहे. हसन मुश्रीफ यांच्या नावामध्ये प्रभू श्रीरामांचं नाव चित्रित केल्यामुळं नवा वाद निर्माण झाला आहे. रामनवमीला जन्माला आल्याचा हसन मुश्रीफांचा (Hasan Mushrif) दावा खोटा आहे. हसन मुश्रीफांचा जन्म रामनवमीला नाही तर रंगपंचमीला झाला असल्याचा दावा भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांनी केला आहे. पुरावे देऊन देखील पोलीस तक्रार दाखल करत नाहीत. मात्र तक्रार दाखल होईपर्यंत मी येथून हलणार नाही असा इशारा समरजितसिंह घाटगे (Samarjeetsinh Ghatge) यांनी दिला. यावेळी. मुश्रीफांच्या प्रतिक्रियेनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत सडेतोड उत्तर दिले.
यावेळी समरजितसिंह यांनी मुश्रीफ यांच्या विरोधात साखर कारखाने, विकिपीडिया वरचे पुरावे सादर केले. ते म्हणाले, विकिपीडिया वरती २४ मार्च १९५४ ही तारीख आहे. तर सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याला (santaji ghorpade sugar factory) दिलेल्या कागदपत्रांमध्ये देखील हीच जन्मतारीख आहे. ते ज्या दिवशी जन्मले त्या दिवशी राम नवमी नव्हे रंगपंचमी होती. मुश्रीफांनी स्वतःच्या अंगावर खोटे रंग रंगवून घेतले आहेत. ११ एप्रिल १९५४ ला रामनवमी असते. तब्बल १८ दिवसानंतर राम नवमी येते असं सांगत त्यांनी पंचाग दाखवले. त्यामुळे मुश्रीफांनी अखंड बहुजन समाजाचा अपमान केला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.