वृत्तसंस्था/ जयपूर
2025 च्या प्रो-कबड्डी लीग स्पर्धेतील झालेल्या सामन्यात हरियाणा स्टिलर्सने तामिळ थलैवासवर 38-36 असा 2 गुणांच्या फरकाने निसटता विजय मिळविला. हरियाणा स्टिलर्सचे प्रमुख प्रशिक्षक मनप्रित सिंग यांच्या दृष्टीकोनातून हा विजय ऐतिहासिक म्हणाला लागेल. प्रो-कब•ाr लीग स्पर्धेत प्रमुख प्रशिक्षक या नात्याने संघाला 100 सामने जिंकून देण्याचा विक्रम मनप्रित सिंग यांनी केला आहे.
हरियाणा आणि तामिळ थलैवास यांच्यातील या सामन्याला सुरुवातीपासूनच आक्रमक खेळाने प्रारंभ झाला. तामिळ थलैवासचा प्रमुख खेळाडू अर्जुन देशवालला हरियाणा स्टिलर्सच्या खेळाडूंनी आपल्या चढाईवर बाद केले. रोनक आणि हिमांशू यांच्या नेतृत्वाखालील हरियाणा स्टिलर्सच्या बचावफळीची कामगिरी शेवटपर्यंत दर्जेदार झाली. त्यानंतर तामिळ थलैवासच्या खेळाडूंनी मध्यंतराला सामन्याचे चित्रच बदलले. विनय आणि शिवम पाठारे यांनी आपल्या चढाईवर तामिळ थलैवासला थोडी नाममात्र आघाडी मिळवून दिली. मध्यंतरापर्यंत हरियाणा स्टिलर्सने तामिळ थलैवासचे सर्व गडी बाद करुन 25-16 अशी आघाडी घेतली. पण सामन्याच्या उत्तरार्धात तामिळ थलैवासने पिछाडी बरीच भरुन काढली आणि सामना संपण्यास केवळ 5 मिनिटे बाकी असताना ते केवळ 2 गुणांनी पिछाडीवर होते. अखेर हरियाणा स्टिलर्सने 2 गुणांची बढत घेत हा सामना जिंकला.









