वृत्तसंस्था/ काकीनाडा (आंध्र प्रदेश)
हॉकी इंडियाच्या कनिष्ठ महिलांच्या राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेत हरियाणा, छत्तीसगड, झारखंड आणि उत्तरप्रदेश यांनी विभाग अ मधून उपांत्य फेरीसाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे.
हरियाणा संघाने ओडिशाचा 4-1 असा पराभव केला. हरियाणा संघातर्फे काजलने दुसऱ्या मिनिटाला, सुप्रियाने 27 व्या मिनिटाला, कर्णधार साशी खासाने 36 व्या आणि सादीने 60 व्या मिनिटाला गोल नोंदविले. ओडिशातर्फे एकमेव गोल अमिशा एक्काने केला. दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात छत्तीसगडने मध्यप्रदेशचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 2-1 असा पराभव केला. दुसऱ्या एका सामन्यात छत्तीसगडने मध्यप्रदेशचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात निर्धारित वेळेत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. छत्तीसगडतर्फे यशोदाने दुसऱ्या मिनिटाला तर हुडा खानने 15 व्या मिनिटाला मध्यप्रदेशतर्फे गोल नोंदविले. पेनल्टी शूटआऊटमध्ये कर्णधार रुक्मिनीने 2 गोल तर मध्यप्रदेशतर्फे एकमेव गोल नोंदविला. उत्तर प्रदेशने महाराष्ट्रचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळविले. उत्तर प्रदेशतर्फे शालू पी. तसेच रश्मि पटेल यांनी तर महाराष्ट्रातर्फे दिक्षा शिंदेने गोल केले. झारखंडने पंजाबवर 3-1 अशी मात करत उपांत्य फेरी गाठली आहे. पंजाबतर्फे पवनप्रित कौरने 6 व्या मिनिटाला गोल केला. 7 व्या मिनिटाला डुंगडुंगने गोल नोंदवून झारखंडला बरोबरी साधून दिली. शांतीकुमारी आणि रोषनी यांनी पंजाबतर्फे प्रत्येकी 1 गोल नोंदविला.









