Satara Political News : पाटण तालुक्यातील जनता सुज्ञ आहे.जनतेच्या भावनांचा अनादर करुन मंत्री शंभूराज देसाई यांना मंत्रीपदाची संधी मिळाली आहे. हा तालुक्याचा बहुमान आहे का की जनभावनेच्या विरोधात गेलेल्या अजून एका निर्णयाचे पाऊल आहे हे येणाऱ्या निवडणूकांमध्ये जनताच त्यांना जागा दाखवून देतील,असा टोला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हर्षद कदम यांनी राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर लगावला.
पाटण तालुक्याला पुन्हा मंत्रीपद मिळाल्याने एका बाजूला जल्लोष साजरा होत असताना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हर्षद कदम यांनी मात्र,त्याबाबत रोखठोक प्रतिक्रिया देत मंत्री देसाई यांच्यावर टोला लगावला आहे. पाटण तालुक्याला मिळालेली मंत्रीपदाची संधी हा तालुक्याचा बहुमान आहे का जनभावनेच्या विरोधात गेलेल्या अजून एका निर्णयाचे पाऊल आहे. हे थोडय़ाच दिवसात येणाऱ्या निवडणूकांमध्ये आपल्याला कळेलच.त्यांना मंत्रीपद मिळाल्याचा कोणताही शिवसेना पक्षाला कोणताही फरक पडलेला नाही आणि फरक पडणार नाही.
जिह्यातील आणि तालुक्यातील शिवसैनिक हा ठामपणे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब यांच्या मागे खंबीरपणे उभा आहे. जिह्यातील संघटनात्मक बांधणीला खूप चांगला प्रतिसाद आहे.सभासद नोंदणी, प्रतिज्ञापत्र आहे. लोकांना सक्रीय करणे, नवीन लोकाना पक्षात घेणे, व्यापक पद्धतीने बांधणी असे काम सुरु आहे, असेही जिल्हा प्रमुख हर्षद कदम यांनी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









