टायगरसोबत झळकणार
2021 मध्ये मिस युनिव्हर्स ठरलेली हरनाज कौर संधू बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. हरनाज आता टायगर श्रॉफसोबत दिसून येणार आहे. बागी 4 या चित्रपटात तिची वर्णी लागली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन एच. हर्षा करत आहेत.
निर्मात्यांनी काही काळापूर्वी बागी 4 या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटात पंजाबी अभिनेत्री सोनम बाजवा देखील दिसून येणार आहे. तसेच संजय दत्त देखील यात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. तर आता यात हरनाजची एंट्री झाली आहे. बागी 4 हा चित्रपट नव्या वर्षात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 5 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हरनाज मागील काही काळापासून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यासाठी प्रयत्न करत होती. हरनाजला आणखी काही प्रोजेक्ट्सच ऑफर मिळाल्याचे समजते. हरनाज ही पुढील काळात मोठ्या अभिनेत्यांसोबत झळकणार आहे.









