वृत्तसंस्था / राऊरकेला
हॉकी इंडियाच्या अगामी हॉकी इंडिया लीग स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सुर्मा हॉकी क्लबच्या कर्णधारपदी भारताचा कर्णधार हरमनप्रित सिंगची नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय हॉकी संघातील हरमनप्रित सिंग हा महत्त्वाचा खेळाडू म्हणून ओळखला जातो. हरमनप्रित सिंगचा यापूर्वी अर्जुन पुरस्कार देवून गौरविण्यात आला आहे. तसेच त्याने दोनवेळा आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचा वर्षातील सर्वोत्तम हॉकीपटूचा बहुमान मिळविला आहे. सुर्मा हॉकी क्लबच्या प्रमुख प्रशिक्षकपदी जेनॉर बार्ट आहे. सुर्मा हॉकी क्लबचा या स्पर्धेतील सलामीचा सामना रविवार दि. 29 डिसेंबरला येथे तामिळनाडू डॅग्नस संघाबरोबर होणार आहे. हॉकी इंडिया लीग स्पर्धेत भारताचे अव्वल हॉकीपटू विवेक सागर प्रसाद, गुरुजंत सिंग, मनिंदर सिंग, सुनित लाकरा, मोहीत एच.एस. तसेच ऑस्ट्रेलियन हॉकीपटू जेरेमी हेवर्ड, बेल्झियमचा हॉकीपटू निकोलास पोनसिलेट आणि हॉलंडचा बोरीस बर्कहार्ट यांचा समावेश आहे.









