अभिनेत्री हरलीन सेठी अलिकडेच ‘कोहरा’ या वेबसीरिजमध्ये दिसून आली होती. अभिनेत्री हरलीन आता अभिनेता वैभव राज गुप्ताला डेट करत आहे. वैभव हा गुल्लक आणि माई या वेबसीरिजमुळे लोकप्रिय झाला आहे. दोघेही मागील काही महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.
हरलीन लवकरच वैभवसोबत विवाहबद्ध होणार असल्याचे समजते. हरलीनच्या मागील रिलेशनशिपची बरीच चर्चा झाली होती. यामुळे ती नव्या रिलेशनशिपबद्दल फारसे बोलणे टाळत आहे. हरलीनचे यापूर्वी विक्की कौशलसोबत नाव जोडले गेले होते. ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाच्या स्क्रीनिंगनंतर दोघांनीही एकत्रित छायचित्र शेअर करत स्वत:च्या नात्याची घोषणा केली होती. परंतु 2019 मध्ये दोघांचा ब्रेकअप झाला होता. या ब्रेकअपनंतर हरलीनने सोशल मीडियावर एक कविता पोस्ट केली होती. हरलीनसोबत ब्रेकअप झाल्यावर विक्की कौशलने अभिनेत्री पॅटरिना कैफसोबत विवाह केला होता.