शनिवारी कुस्ती मैदान, कुस्ती शौकिनांना आकर्षण
बेळगाव : काकती येथे श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी व काकती ग्रामस्थ आयोजित श्री सिद्धेश्वर देवस्थान यात्रेनिमित्त भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मैदानात प्रमुख कुस्ती हरियाणा चॅम्पियन हरिषकुमार व बेळगावचा उगवता मल्ल कामेश पाटील-कंग्राळी खुर्द यांच्यात होणार आहे. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती शुभम भोसेकर-सांगली वि. कर्नाटक चॅम्पियन प्रेम जाधव, तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती प्रवीणकुमार-हरियाणा वि. पार्थ पाटील-कंग्राळी, चौथ्या क्रमांकाची कुस्ती विक्रम-शिनोळी वि. पृथ्वीराज पाटील-कंग्राळी, पाचव्या क्रमांकाची कुस्ती कुमार गोकाक वि. रामदास काकती यांच्यात, सहाव्या क्रमांकाची कुस्ती महेश तीर्थकुंडये वि. सुफीयाद सय्यद-राशिवडे, सातव्या क्रमांकाची कुस्ती ओमकार-राशिवडे वि. प्रथमेश हट्टीकर-कंग्राळी, आठव्या क्रमांकाची कुस्ती भूमीपुत्र-मुतगा वि. रोहन-कडोली, नवव्या क्रमांकाची कुस्ती तेजस लोहार-राशिवडे वि. परसु-हरिहर, दहाव्या क्रमांकाची कुस्ती प्रज्वल-कडोली वि. मंथन-सांबरा यांच्यात होणार आहे. या शिवाय लहान, मोठ्या 40 हून अधिक कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. खास आकर्षक कुस्ती संभाजी प्रमोजी-काकती वि. रोहीत माचीगड यांच्यात होणार असून महिलांना मल्लांना प्रोत्साहन देण्यासाठी महिलांच्या कुस्तीचे आयोजन करण्यात आले आहे. स्वाती स्पोर्ट्स हॉस्टेल वि. प्रांजल अवचारहट्टी, भक्ती पाटील कंग्राळी वि. भाग्यश्री स्पोर्ट्स हॉस्टेल यांच्यात होणार आहे.









