बेळगाव : रायबाग तालुक्यातील बुवाची सौदती येथील सुगंधादेवी यात्रेनिमित्त आयोजित भव्य आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान कोल्हापूरच्या माऊली जमदाडेने हरियाणाच्या रूपेशला 20 मिनिट झुंजवत एकेरी पटकाडून गदेलोट डावावर आस्मान दाखवून उपस्थित कुस्ती शौकिंनांची मने जिंकले. प्रमुख कुस्ती जिल्हापालकमंत्री सतीश जारकीहोळी, महावीर मोहीतेसह इतर मान्यवरांच्या हस्ते उपमहाराष्ट्र केसरी माऊली जमदाडे वि. हरियाणाचा रुपेश यांच्यात लावण्यात आली. दुसऱ्या मिनिटाला माऊली जमदाडेने एकेरीपट काढून रुपेशला खाली घेत घिस्यावरती चित करण्याचा प्रयत्न केला होता. पण शेवटच्या क्षणी रुपेशने आपली पाठ फिरवून त्यातून सुटका करुन घेतली. 16 व्या मिनिटाला रुपेशने पायाला टाच मारुत जमदाडेवर कब्जा मिळविला. पण जमदाडेने त्यातून सुटका करुन घेतली. 19 व्या माऊलीने एकेरीपट काडून रुपेशला खाली घेत सवारी भरत गदेलोट डावावरती चित करुन उपस्थित कुस्ती शौकिकांनी मने जिंकली.
त्याला प्रथम क्रमांकाचे दोन लाख रुपये बक्षीस व मानाची गदा मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती डबल कर्नाटक केसरी कर्नाटक तालमीचा केसरी कार्तिक काटे व किरण शिंदे यांच्यात मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. चौथ्या मिनिटाला कार्तिक काटेने एकेरीपट काढून किरणला खाली घेत पायाला मजबूत एकलांगी लावून एकलांगी डावावरती चित करुन उपस्थितीत कुस्ती शौकिकांकडून वाहवा मिळविली. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती बाळू अपराज व सांगलीचा संग्राम पाटील यांच्यात झाली. या कुस्तीत बाळू अपराधने संग्रामवर एकचाक डावावरती विजय मिळविला. मनोरंजक कुस्ती नेपाळचा कुस्तीपटू देवा थापा व नेपाळचाच गुजर यांच्यात झाली. स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री सतीश जारकीहोळी, आप्पासाहेब कुलगुडे, एन. ए. मगदूम, दिलीप जमादार, अर्जुन भुई, गणेश मोहिते, तमण्णा निगनुरे, दशरथ काटे, अर्जुन नाईकवाडे आदी उपस्थित होते.









