हरिनाम सप्ताहाची सोमवारी होणार सांगता
ओटवणे | प्रतिनिधी
भालावल गावचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी मंदिरात सालाबाद प्रमाणे शनिवारी १ नोव्हेंबर रोजी होणारा हरिनाम सप्ताह काही अपरिहार्य कारणामुळे रविवारी २ नोव्हेंबर रोजी होणार आहे. सात प्रहराच्या या हरिनाम सप्ताहाची सांगता दुसऱ्या दिवशी सोमवारी दुपारी होणार आहे.यानिमित्त रविवारी सकाळी मंदिरात विधिवत हरिनाम सप्ताहाला प्रारंभ झाल्यानंतर भालावल परीसरातील वारकरी भजन मंडळे आपली सेवा श्री चरणी अर्पण करणार आहेत. हरिनामाचा गजर अखंड सुरु राहणार आहे. सोमवारी दुपारी या हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे.एक दिवस पुढे गेलेल्या या हरिनाम सप्ताहाची भाविकांनी नोंद घ्यावी आणि कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन भालावल देवस्थानच्या मानकऱ्यानी आणि ग्रामस्थानी केले आहे.









