Hari Narke : जेष्ठ विचारवंत लेखक प्रा. डॉ. हरी नरके यांच वयाच्या 70 व्या वर्षी निधन झालं. गेल्या काही दिवसापासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया देखील झाली होती.आज हृदयविकाराने त्यांच निधन झालं. मुंबईतील एशिअन हार्ट इंस्टिट्यूटमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. परखड आणि स्पष्ट विचारासाठी ते प्रसिध्द होते. सध्या समाजात घडणाऱ्या घडनांवर ते व्यक्त व्हायचे, मत मांडायचे.
प्रा. हरी नरके यांनी पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे अध्यासन प्राध्यापक म्हणून काम पाहिलं. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री बाई फुले यांच्याविषयी हरी नरके यांनी समग्र लिखाण केलं. ते समता परिषदेचे उपाध्यक्ष होते. त्यांचा महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीशी निकटचा संबंध होता. सामाजिक चळवळींना विचार पुरवायचे काम ते करत होते. महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज यांच्या ग्रंथाचे संपादन त्यांनी केल. महाराष्ट्रातील महापुरुषांचे जिवीतकार्याचे संपादन करण्याचे देखील काम त्यांनी केलं. राज्यसरकारच्या प्रकाशन विभागाने महापुरुषांचे ग्रंथ प्रकाशित केले होते त्याचे संपादन नरके यांनी केल होत. याचबरोबर समता परिषदेशी ते जोडले गेले होते. पुण्यातील समता परिषदेकडून दरवर्षी पुरस्कार प्रदान केले जातात, यामध्ये देखील त्यांचा मोठा वाटा होता. महाराष्ट्राच्या चळवळीचा आधारवड निघून गेल्याने चळवळीचे नुकसान झाले आहे. गेली अनेक दशके हे काम ते सातत्याने करत होते. विद्यार्थी दशेपासून त्यांनी चळवळीत भाग घेतला होता.








