खानापूर : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) यांच्यातर्फे गुरुवारी खानापूर येथे 21 वा हरेकृष्ण रथयात्रा महामहोत्सव उत्साहात पार पडला. खानापूर व बेळगाव परिसरातील भाविक मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी झाले होते. रथयात्रा महोत्सवात यावषीही भाविकांची गर्दी झाली होती. या रथोत्सवाची सुरूवात गुरुवारी जांबोटी क्रॉस येथील बसवेश्वर सर्कल येथून भक्ती रसामृत महाराज यांनी रथ ओढून रथोत्सवाला चालना दिली. भक्ती करुणामय वनमाली, नागेंद्र दास, रघुवर दास, महात्मा दास, उत्तमशिव प्रभू आणि हरे कृष्ण भक्त समूहाचे भक्त तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हरे कृष्णाच्या गजरात भजन गात जांबोटी सर्कलपासून शिवस्मारक मार्गे, स्टेशनरोड त्यानंतर मलप्रभा नदी काठावरील जगन्नाथ मंदिराजवळ येऊन रथोत्सवाची सांगता झाली. यावेळी प्रत्येकाच्या मुखात हरे राम हरे कृष्णा गजर ऐकायला मिळत होता. त्यानंतर भजन, नामस्मरण करण्यात आले. यानंतर करुणामय वनमाली यांचे भक्ती रसामृत कीर्तन पार पडले. नाट्यालीला झाल्यानंतर सर्वांसाठी महाप्रसादाचे वाटप झाले. यावेळी प्रमोद कोचेरी, संजय कुबल, सदानंद पाटील, गुंडू तोपिनकट्टी, राजेंद्र रायका, के. पी. पाटील, डॉ. चंद्रकांत पाटील, सुरेश देसाई, पंडित ओगले, प्रशांत लक्केबैलकरसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पूजनाने रथोत्सवाला सुरुवात झाली. रथाचा दोर ओढून प्रारंभ केला.









