वृत्तसंस्था/ लखनौ
2025 च्या हॉकी इंडिया लीग स्पर्धेसाठी यूपी रुद्राज संघाच्या कर्णधारपदी भारताचा मध्यफळीत खेळणारा आंतरराष्ट्रीय हॉकीपटू हार्दिक सिंगची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर घोषणा या संघाच्या फ्रांचायजीने रविवारी केली. येदू स्पोर्ट्स हे यूपी रुद्राज संघाचे फ्रांचायजी आहेत.
यूपी रुद्राज संघामध्ये गुरुज्योतसिंग, ललितकुमार उपाध्याय, सिमरनजित सिंग, लारेस बल्क, केन रसेल आणि पी. तालेम यांचा यापूर्वी समावेश करण्यात आला आहे. हार्दिक सिंगच्या समावेशामुळे यूपी रुद्राज संघ अधिक बलवान झाला आहे.









