अहमदाबाद
2025 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत येथे शनिवारी झालेल्या गुजरात टायटन्स संघाविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला षटकांची गती राखता न आल्याने या संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याला आयपीएलच्या नियमानुसार 12 लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे.
शनिवारी येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा 36 धावांनी पराभव करत आपल्या विजयाचे खाते उघडले. मुंबई इंडियन्सने यापूर्वी पाचवेळा आयपीएल स्पर्धा जिंकली होती. या स्पर्धेतील हा नववा सामना होता. मुंबई इंडियन्स संघाचा हा सलग दुसरा पराभव आहे.









