वृत्तसंस्था/ अमान (जॉर्डन)
येथे सुरु झालेल्या 15 आणि 17 वर्षाखालील वयोगटाच्या आशियाई मुष्ठीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या हार्दिक दाहिया आणि रुद्राक्ष सिंग यांनी विजयी सलामी दिली.
मुलांच्या 15 वर्षाखालील वयोगटातील 43 किलो वजन गटात झालेल्या पहिल्या लढतीत भारताच्या हार्दिक दाहियाने किर्जिस्थानच्या बोलुशोव्हचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. त्याचप्रमाणे 17 वर्षाखालील वयोगटातील 46 वजन गटात झालेल्या पहिल्या लढतीत भारताच्या रुद्राक्ष सिंगने मंगोलियाच्या इब्राकहिम मेरलचा 5-0 अशा गुणफरकाने पराभव केला. या स्पर्धेसाठी भारताचा 56 जणांचा संघ सहभागी झाला आहे.









