Food Marathi Recipe : नियमित आहारात पालेभाज्यासोबत कडधान्ये असावीत असा समीकरणच अनेक घरात पाहायला मिळतं. पण अनेकांना कडधान्य खायला आवडत नाहीत. अशावेळी वेगवेगळ्या ट्रिक्स वापरून गृहिणी भाज्या बनवायचा प्रयत्न करत असतात. आज आम्ही तुम्हाला हरभरा भाजी बनवण्याची रेसीपी सांगणार आहोत. हि भाजी बनवत असताना जी ग्रेव्ही बनवणार आहोत तीच ग्रेव्ही तुम्ही वटाणा, मटकी सारख्या भाज्यांमध्य़े वापरू शकता. यामुळे इतरही भाज्या टेस्टी लागतील आणि न खाणारेही दाटसर अशी भाजी खाऊ लागतील. चला तर मग जाणून घेऊया रेसीपी.
साहित्य
भिजवलेले हरभरे- 1 वाटी
मोठा कांदा- 1
टोमॅटो-2
कोथंबिर- पाव कप
खडा मसाला- आवडीनुसार (लवंग, मिरे, वेलदोडा, डालचिनी)
लाल तिखट-2 चमचे
धना पावडर- 2 चमचे
गरम मसाला- 1 चमचा
आल्ले- 1 इंच
लसूण पाकळ्या- 5 ते 6
कडीपत्ता-5 ते 6 पाने
कृती
सुरवातीला कुकरमध्ये भिजवलेला हरभरा, हळद, पाव चमचा मीठ, 2 लवंगा, दोन मिरे, डालचिनीचा छोटा तुकडा आणि 1 वेलदोडा 1 ग्लास पाणी घालून मध्यम आचेवर तीन शिट्ट्या काढून घ्या. यानंतर आल्ले,लसूण, टोमॅटो, कोथंबिर आणि थोडे शिजवलेले हरभरे शिवाय हरभऱ्यात शिजलेला खडा मसाला एकत्र करून मिक्सरमधून वाटण करून घ्या. यानंतर कढईत 2 चमचे तेल घाला. तेल गरम झालं की त्यात मोहरी टाका. मोहरी चांगली तडतडली की त्यात जिरे घाला. यानंतर कां आणि कडीपत्ता टाकून चांगले परतून घ्या. कांदा चांगला भाजला की, त्यात वाटण घाला. वाटणला तेल सुटल्यानंतर त्यात लाल तिखट, धने पावडर घाला. मसाला चांगला भाजला की त्यात शिजलेला हरभरा घाला. मिश्रण चांगले एकजीव झाले की त्यात थोडे गरम पाणी घाला आता गॅस मंद आचेवर ठेवून हरभरा चांगला शिजवून घ्या. तुम्हाला जर थोडस सरसरीत हरभरा हवा असेल तर तुम्हा पाणी वाढवू शकता. झाली हरभऱ्याची भाजी तयार. तुम्हाला जर तडका आवडत असल्यास तुपाचा आणि लाल मिरचीचा तडका घालून तडका देवू शकता.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









