वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दोन दशकांहून अधिक काळानंतर 2025 मध्ये होणाऱ्या प्रतिष्ठित फिडे विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भारताला मिळाल्याचा आनंद होत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले.
बुद्धिबळ तरुणांमध्ये लोकप्रिय होत आहे आणि या स्पर्धेत रोमांचक सामने होतील आणि जगभरातील अव्वल खेळाडूंची प्रतिभा प्रदर्शित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, ‘भारताला प्रतिष्ठित फिडे विश्वचषक 2025 चे आयोजन करताना आनंद होत आहे आणि तेही दोन दशकांहून अधिक काळानंतर गोवा 30 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर या कालावधीत फिडे विश्वचषक आयोजित करेल.’ ही स्पर्धा पुढील वर्षीच्या कँडिडेट्स स्पर्धेसाठी तीन प्रतिष्ठित स्थाने आणि दोन दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस देणारी आहे. 206 सदस्यांच्या या संघात विश्वविजेता डी. गुकेश, मॅग्नस कार्लसन, फॅबियानो कारुआना आणि आर. प्रज्ञानंद यांचा समावेश आहे.









